Pune Kondhwa Crime | लोखंडी रॉड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा दाखल; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | क्लासवरुन घरी जाणाऱ्या मुलाला मारहाण करणाऱ्या तरुणाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली (Attempt To Kill). हा प्रकार मंगळवारी (दि.27) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोंढवा परिसरातील समतानगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या जवळ घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Kondhwa Crime)

याबाबत दिलावर करिम सय्यद (वय-41 रा. आर युफोरिया सोसायटी, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन झैद आसिफ सय्यद (वय-18), सैफ आसिफ सय्यद (वय-25), आसिफ सय्यद (वय-50 सर्व रा. आगरा हॉटेल मागे, कौसरबाग, कोंढवा) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Murder)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा मुलगा व त्याचा मित्र क्लासवरुन दुचाकीवरुन घरी जात होते.
त्यावेळी आरोपी झैद याने कौसरबाग येथील एका हॉटेल जवळ अडवले.
त्याने फिर्यादी यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी मुलाने वडील फिर्य़ादी यांना फोन करुन बोलावून घेतले. फिर्यादी त्याठिकाणी जाऊन झैद याला समजावून सांगत भांडण सोडवत होते. त्यावेळी तो आगरा हॉटेलच्या बेसमेंटमध्ये पळून गेल्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा त्याला पकडण्यासाठी गेले.

त्यावेळी आरोपी आसिफ याने फिर्य़ादी यांच्या तोंडावर पंच मारुन जखमी केले.
आसिफचा मुलगा सैफ याने ‘आज इसका मर्डर करता हुं’ असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड फिर्यादी
यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मुलाला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याचे
फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे (PSI Vaibhav Sonavane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Polls | दांडगा जनसंपर्क व नातेवाईकांच्या गोतावळ्याची शिवाजी मानकर यांना ताकद, पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार

Sanjay Raut-Sharad Pawar-PM Narendra Modi | पवारांनी राजकारणापलिकडे जाऊन केलेली मदत मोदींनीच वारंवार सांगितली : संजय राऊत

दाजीकडून अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; वडगाव भागातील प्रकार

इन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बिबवेवाडी भागातील घटना

Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार मार्गदर्शकावर शस्त्राने वार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

Pune PMC News | बायोमायनिंग करून मोकळया केलेल्या जागेवर पुन्हा ‘रिजेक्ट’ कचर्‍याच्या ‘लँडिफिलिंग’ची निविदा

Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल