Pune Kondhwa Crime | विभक्त राहणाऱ्या पत्नीवर ब्लेडने सपासप वार, कोंढवा येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | विभक्त राहणाऱ्या पत्नीवर ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.19) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोंढवा येथील क्वीन्स गार्डन सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Kondhwa Crime)

याबाबत सिद्धार्थनगर, कोंढवा येथील 20 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनमोल लक्ष्मीकांत गिरी (वय-34 रा. क्वीन्स गार्डन सोसायटी, कोंढवा) याच्यावर आयपीसी 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत. फिर्यादी यांच्या पतीला दारुचे व्यसन होते. तो दारु पिऊन फिर्य़ादी यांच्यासोबत सतत भांडण करत होता. त्यामुळे फिर्यादी मागील एक वर्षापासून त्याच्यापासून विभक्त राहत आहेत. सोमवारी दुपारी भांडी धुण्याचे काम करु परत जात असताना आरोपीने सोसायटीच्या पार्किंगमध्ये अडवले. त्याने सोबत आणलेल्या ब्लेडने फिर्यादी यांच्यावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले पुढील तपास पोलीस करीत आहेत.

किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

सिंहगड रोड : हॉल तिकीटाच्या झेरॉक्सचे पैसे मागितल्याच्या कारणावरून सहा जणांनी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच दुकानातील सामानाची तोडफोड केली. हा प्रकार सिंहगड रोडवरील संतोष हॉल जवळील निळकंठ मेडीकल येथे घडली.
याप्रकरणी माणिकबाग येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून यशिता गणाराम चौधरी, प्रणाली सुदाम झावरे, स्वप्निल सत्यवान जाधवर, उत्कर्ष रामहरी वरवे, प्रणव संजयराव
गायकवाड, प्रथमेश नारायण लावंड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करीत आहेत. (Pune Sinhagad Road Crime)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Bill | मोठी बातमी, मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, पण मनोज जरांगेंनी व्यक्त केला संताप

Pune PMC News | देवाची उरूळी कचरा डेपोतील ‘बायोमायनिंग’ प्रकल्प महिन्याभरापासून बंद; निविदा प्रक्रियेच्या ‘घोळा’ मुळे पालिकेला ‘एनजीटी’चा सामना करावा लागणार !