Pune Kondhwa Crime | पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला अश्लील मेसेज करुन धमकी, दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | उसने दिलेल्या पैशांची मागणी केल्याच्या कारणावरुन अश्लील मेसेज करुन धमकी दिल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) दोघांवर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढवा येथे महिलेच्या घरात ऑनलाईन पद्धतीने 2020 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडला आहे. (Pune Kondhwa Crime)

याबाबत एनआयबीएम रोड, कोंढवा येथे राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.14) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सुरेश निगुंडा नाईक (रा. निंगुर्डा नाईक, ता. आठानी, संगोनाती बेळगावी, कर्नाटक), सिद्धार्थ अशोक शिंदे (रा. कृष्णा नगर, महंमदवाडी रोड, हडपसर) यांच्यावर आयपीसी 354, 354 (अ)(ड), 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी सुरेश नाईक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीला पैशांची आवश्यकता असल्याने फिर्यादी यांनी त्याला वेळोवेळी 20 लाख 60 हजार रुपये उसने दिले होते. त्यापैकी आरोपीने 16 लाख 40 हजार रुपये परत केले आहे. महिलेने उर्वरीत पैशांची मागणी आरोपीकडे केली. त्यावेळी त्याने महिलेला इंग्रजीमध्ये टेक्स मेसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी केली.

तर आरोपीचा मित्र सिद्धार्थ शिंदे याने महिलेला फोन करुन ‘तुझी मुलगी कुठे शिकते मला माहीत आहे, तु त्याला पैसे मागु नको’ अशी धमकी दिली. तसेच तु जर आमची पोलिसांकडे तक्रार दिली तर ‘आम्ही तुला व तुझ्या मुलीला जगु देणार नाही’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोबाईल हॅक, महिलेचा फोटो मॉर्फ करुन केला व्हायरल, येरवडा परिसरातील प्रकार

Babanrao Gholap | उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

पुणे : धक्कादायक! पैशांसाठी 15 दिवस डांबून ठेवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ग्राहकांकडून पैसे घेऊन पिडीतेला देहविक्री करण्यास भाग पाडले ! पती-पत्नीविरूध्द गुन्हा, महिलेला अटक

Punit Balan | खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Sunny Vinayak Nimhan | माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सुपर सनी विक क्रिडा महोत्सवाचे आयोजन

Pune Wakad Crime | भाजीपाला विकल्याप्रमाणे वाकडमधील म्हातोबानगरात विकला जातो गांजा; विक्रेत्या चार महिलांसह सहा महिलांवर गुन्हा दाखल

Pune PMC Property Tax | शहरातील तब्बल 19 हजार ओपन प्लॉटधारकांवर महापालिका ‘उदार’; 2000 कोटींच्या थकबाकीला ‘अभय’ देण्याच्या हालचाली