Pune Kondhwa Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचे नराधम बापाकडून लैंगिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक करून तिचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील बुध येथे मागील एक वर्षापासून ते 26 मार्च 2024 या कालावधीत घडली.(Pune Kondhwa Crime)

या प्रकरणी पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने सोमवारी (दि.1 एप्रिल) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन नराधम बापावर आयपीसी 354(अ) सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पती – पत्नी असून, त्यांना 13 वर्षांची मुलगी व 10 वर्षाचा मुलगा आहे. आरोपीने दारु पिऊन मुलांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत गैरवर्तन केले. पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने हा प्रकार समोर आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पाठलाग करुन महिलेचा विनयभंग

पुणे : भाजी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाठलाग करुन तिच्याकडे मोबाईल नंबर मागितला.
तसेच वाईट उद्देशाने महिलेसोबत बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
हा प्रकार रविवारी (दि.31) सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान शिवाजीनगर गावठाणातील (Shivaji Nagar Gaothan)
रोकडोबा मंदिरा (Rokdoba Mandir Pune) जवळ घडला. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आसीफ रसीद शेख (वय-32 रा. जनता वसाहत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Molestation Case)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Andolak-Ashok Chavan | संतप्त मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांची गाडी आडवली, जोरदार घोषणाबाजी, अखेर माघारी फिरले

Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ