Pune Kondhwa News | कोंढव्यात नागरिकांची बैठक ! रमजानच्या पवित्र महिन्यात सौहादर्याचे वातावरण ठेवा – पाेलीस सह आयुक्त संदीप कर्णिक

पुणे : Pune Kondhwa News | रमजानचा पवित्र महिना (Ramadan 2023) सुरु होत आहे. या काळात सामाजिक सौहादर्याचे वातावरण ठेवून शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik) यांनी केले. (Pune Kondhwa News)

रमजान महिना येत्या २४ मार्चपासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) पुढाकाराने कोंढव्यात मुस्लिम बांधव, मौलाना, लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात कर्णिक बोलत होते. (Pune Kondhwa News)

या बैठकीला अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त पाैर्णिमा तावरे (ACP Poornima Taware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (SR PI Santosh Sonawane) , माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) आदी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी या भागात येणार्‍या अडचणी मांडल्या. या काळात पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, यासंबंधी आवश्यक ती काळजी घेण्याची खबरदारी महापालिका, महावितरण यांनी घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

तसेच सायंकाळी रस्त्यावर एकाचवेळी गर्दी होते. अनेक जण वेडीवाकडी वाहने लावतात.
त्यामुळे वाहतूक कोंडी येत असते. नागरिकांनी रस्त्यावर पार्किंग न करता स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, कोंढव्यात सर्व समाजाचे सण खेळीमेळीच्या वातावरणात
साजरे केले जातात. दर्ग्याच्या उरुसामध्ये आम्ही चादर अर्पण करतो .
उरुस मोठ्या उत्साने साजरा केले जातात असा एकोपा व परंपरा कोंढवा गावामध्ये आहे.
बाहेर कोणीही काही म्हणाले तर कधीही पंत वाद होत नाही . यातसर्व समाजातील नागरिक सहभागी होतात.
यावेळी मौलाना निझामुद्दीन, मुफ्ती शाहिद, कारिईद्रिस, महादेव बाबर, जाहिद शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title : Pune Kondhwa News | Citizens’ meeting in Kondhwa! Maintain an atmosphere of camaraderie during the holy month of Ramzan – PALIS Joint Commissioner Sandeep Karnik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या