Pune Kondhwa News | कोंढव्यात फीटनेस केज जीमचे उद्घाटन; नदीम बिल्डर व असिफ शेख यांचा उपक्रम (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa News | आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामाचा फक्त शरीरालाच नाही तर मनालाही फायदा होतो. उत्तम आरोग्य, मजबूत शरीर, लवचिकता अशा अनेक गोष्टींवर व्यायामाचा चांगला परिणाम होतो. हे लक्षात घेऊन नदीम खान (Nadeem Khan Kondhwa) आणि असिफ शेख (Asif Shaikh Kondhwa) यांनी कोंढव्यात (Pune Kondhwa News) नुकतीच अत्याधुनिक फीटनेस केज जीमची उभारणी केली आहे. या जिमचे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (Pune Kondhwa News)

 

 

कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील एच एम रॉयल सोसायटीत ही जिम सुरु करण्यात आली आहे. ही जिम अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी आहे. या जिममध्ये तरुणांना बॉडीबिल्डिंगसाठी लागलेले सर्व साहित्य उपलब्ध आहे. वर्कआऊट घेण्यासाठी प्रशिक्षित ट्रेनर आहे. (Pune Kondhwa News)

 

 

येथे कार्डिओ सुविधा उपलब्ध असून प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येते. प्रशिक्षकाची सोय इथे उपलब्ध असल्याचे जिमचालक नदीम खान आणि असिफ शेख यांनी सांगितले.

 

व्यायामाची आवड असणार्‍या आणि फीट राहण्यास प्राधान्य देणार्या तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना कोंढव्यात एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), चेतन टिळेकर, ईसाक पानसरे, भारत चौधरी, नदीम शेख, उबेद शह, मिया भाई, इम्रान शेख, फिरोज कुरेशी, याकूब अलंद, ऑल कोंढवा समाज सेवक जफर खान, बाडू कामठे, सुनील कामठे, तन्वीर जोड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Web Title :  Pune Kondhwa News | Inauguration of Fitness Cage Gym in Kondhwa;
Activities by Nadeem Builder and Asif Shaikh (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘तुझे देख के मुझे मेरे मरी हुई बीवी की याद आ गई’ ! 50 वर्षाच्या नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीस लाच प्रकरण! बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime | जोडप्याचे रिक्षात अश्लिल चाळे, हटकल्याच्या रागातून रिक्षा चालकाचा खून; दापोडी मधील घटना