Pune : कत्तल करण्यासाठी आणलेली 24 जनावरे पोलिसांनी सोडवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील कोंढवा परिसरात कत्तल करण्यास ठेवलेली तबल २४ जनावर पोलिसानी कारवाईकरून सोडवली आहेत. तर तिघांना अटक केली. ही कारवाई काल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आहिल गोट फार्म कोंढवा येथे करण्यात आली.

शब्बीर बहादूर कुरेशी (वय ५७), कादर रईस अहमद कुरेशी (वय ४६, दोघेही रा. कोंढवा खुर्द ) आणि मारी कृष्णा शिंदे (वय २२, रा. महमंदवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सरकाारतर्फे पोलीस शिपाई अतुल शिरसाठ यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

येथील आहिल गोट फार्मममध्ये बेकायदेशिररित्या जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका वाहनाचा पाठलाग केला. तर त्यात तीन जनावरांची कत्तल करण्यासाठी आहिल गोट फार्ममध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, १० विदेशी लहानमोठ्या गाई, १४ लहानमोठे विदेशी बैल मिळून २४ जनावरे कत्तल करण्यासाठी डांबण्यात आल्याचे दिसून आले. जनावरांना दाटीवाटीने क्रूरपणे वागणूक दिल्याबद्दल गुन्हा दाखल करून शब्बीर, कादर, मारी यांना अटक केली. अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.