Pune News : कोंढव्यातील कामगाराला बेदम मारहाण, रोकड व मोबाईल हिसकावला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – इस्त्रीच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण करून रोकड व मोबाइल हिसकावल्याची घटना घडली आहे. कोंढाव्यात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी त्याला पकडले आहे.

दीपक अंकुश लोणके (वय ३२,रा. साळवे गार्डनसमोर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणकेबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. अखिलेश कुमार (वय १८,रा. उंड्री रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अखिलेश कुमार एका इस्त्रीच्या दुकानात कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी तो सायंकाळी मँगो वुड सोसायटीत इस्त्रीचे कपडे देण्यासाठी गेला होता. तेथून तो दुकानात परत निघाला होता. त्यावेळी लोणके आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाने गजाने कुमारला बेदम मारहाण केली. त्याच्याकडील 800 रुपये व मोबाइल तसेच दुचाकी घेऊन लोणके आणि साथीदार पसार झाले.

कुमारने या घटनेची माहिती त्याच्या मालकांना दिली. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पसार झालेल्या लोणकेसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात अलो. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करत आहेत.