पुण्यातील कोंढव्यात तुंबळ हाणामारी, 5 जणांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – आईस्क्रिम खाण्यासाठी दाजींसोबत आल्यानंतर रागाने पाहिल्यावरून झालेल्या वादात टोळक्याने तिघांना शिवीगाळकरून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून, दोघे पसार झाले आहेत.

नजीम जलील शेख (वय 22), अब्बास आयुब खान (वय 21), साकीब अकील पठाण (वय 18), सोहेल जेनद्दीन नदाफ (वय 20) व शाहाबाज आयुब खान (वय 23, सर्व रा. कोंढवा परिसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत वसीम जमादार (वय 32) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसीम, त्याचा भाऊ आणि दाजी असे तिघेजन घराच्या बाहेर आईस्क्रिम खाण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपी क्रमांक नजीम शेख व त्यांच्या एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला. त्यानंतर नजीम याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. वाद सोडविण्यासाठी फिर्यादींचा भाऊ आणि दाजी आले असता त्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

You might also like