कोंढव्यात पोलीस असल्याची बतावणी करुन 1 लाख लुटले, एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनच्या काळात गोदाम सुरु ठेवून गुटखा विकतो, असे सांगून गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १ लाख रुपये लुटून नेले.

याप्रकरणी प्रकाश पेमाराम भाटी (वय ३२, रा. अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे एका गोदामामध्ये २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तातडीने तपास विनोद लक्ष्मण गोडांबे (वय ३३, रा. पाषाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश भाटी यांचे किराणा मालाच्या साहित्याचे गोदाम अजमेरा पार्क येथे आहे. २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्याच्या दरम्यान चौघे जण त्यांच्या गोदामात आले. त्यांनी आम्ही क्राईम बँचचे पोलीस असल्याची बतावणी केली.

लॉकडाऊनच्या काळात गोदाम कसे सुरु ठेवले. गुटखा विकतो का असे म्हणून त्यांना कारवाईची भिती दाखविली. त्यानंतर त्यांनी कारवाई करायची नसेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगून १५ लाख रुपयांची मागणी केली. भाटी यांनी १ लाख रुपये दिल्यावर ते निघून गेले.

कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की या दरम्यान त्यांनी या पोलिसांचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करुन ठेवले होते. हे पोलीस नसल्याची त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली.

भाटी यांच्यावर यापूर्वी कारवाई झाली आहे. त्यावरुन चोरट्यांनी त्यांना हेरले. चोरट्यांनी वापलेल्या गाड्यांचे नंबर मिळाल्याने पोलिसांनी विनोद गोडांबे याला अटक केली आहे. गोडांबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी,शिवाजीनगर , पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहे. त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे , अधिक तपास करीत आहेत.