पुण्यातील कोंढव्यात पत्नीसह मुलांना पट्ट्याने बेदम मारहाण करणाऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पत्नी घरातील कामे करीत नसल्याचा रागातून दोन अल्पवयीन मुलांना पट्टयाने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. पोलिसानी पतीला अटक केली आहे. 16 ते 20 मार्च या कालावधीत ही घटना घडली आहे.

एकेंद्र रामसिंग भिका (वय 30  रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने कोंंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकेंद्र आणि पिर्यादी महिला पती-पत्नी आहेत. कोेंढवा बुद्रुकमधील शिवनेरीनगर येथे राहतात. काही दिवसांपुर्वी एकेंद्र याच्या पत्नीने घरातील कामे केली नव्हती. त्याचा राग मनात होता. त्याने रागाच्या भरात स्वतःच्या पाच आणि सातवर्षीय अल्पवयीन मुलांना पट्टयाने बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीला मारहाण करुन डोके भिंतीवर आपटून जखमी केले. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.