पुणे : चोरट्याकडे सापडले तब्बल ५४ मोबाईल, कोंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढवा येथे संशयास्पदरित्या फिरत असलेल्या तरुणाला पकडून पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडील बॅगेत तब्बल ५४ मोबाईल आढळून आले आहेत. या मोबाईलविषयी तो पोलिसांना काहीही माहिती देत नसून हे सर्व मोबाईल चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय आहे़ पोलीस आता या मोबाईलच्या मालकांचा शोध घेत आहेत.

यडप्पा हिरेकरु (वय २५, रा. कृष्णानगर, बी. टी.कवडे रोड, घोरपडी) असे त्याचे नाव आहे़ तो मुळचा हुबळी जिल्ह्यातील आवेरी गावचा राहणारा आहे़ कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना मोबाईल चोरीमध्ये सक्रीय असलेला चोरटा कोंढवा कमेला येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे व त्यांच्या पथकाने कमेला चौकात सापळा लावला काही वेळाने तेथे हातात काळी बॅग घेऊन एक जण आला पोलिसांना पाहून तो भेदरला व पुन्हा परत जाऊ लागला हे पाहून पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली बॅगेची तपासणी केली तेव्हा त्यात साडे पाच लाख रुपयांचे ५४ साधे व अ‍ॅन्डांँईड मोबाईल मिळाले त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे़ खटल्याचा पुढील तपास न्यायालयाच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

यडप्पा हिरेकरु हा सध्या पुण्यातच राहणार असून त्याच्याकडील मोबाईल चोरीचे असल्याचा संशय आहे़ हे मोबाईल कोणाचे आहेत, त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.

सदरची कामगिरी सुनील फुलारी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांचे सूचना प्रमाणे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे , सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार , पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे , सहायक पोलिस फौजदार इक्बाल शेख , पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलीस नाईक , सुशील धिवर , कौस्तुभ जाधव , उमाकांत स्वामी, अझीम शेख, दीपक क्षीरसागर , गणेश आगम,सुरेश भापकर , किरण , मोहन मिसाळ यांनी केलेली आहे .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like