Pune Kondhwa Police Station | कोंढवा पोलीस ठाण्यात मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणपतीची आरती, पोलिसांचा अभिनव उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Police Station | गणपती उत्सव हा समाजात एकी निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य पूर्व काळात सुरू करण्यात आला. तोच उद्देश डोळ्या समोर ठेवून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्व धर्म समभाव गणपती आरती’चे आयोजन करण्यात आले होते. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती (Ganesh Arti) करण्यात आली. पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (Pune Kondhwa Police Station)

धार्मिक आणि सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी अखंड पणे प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते ‘गणपती बप्पाची सर्व धर्म समभाव आरती’ सोमवारी (दि.25) दुपारी चार वाजता करण्यात आली. सर्व धर्म समभाव आरतीमध्ये पोलीस ठाण्यातील अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Pune Kondhwa Police Station)

अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांच्यासह इतर पोलिस अधिकारी आणि कोंढव्यातील हिंदु-मुस्लीम नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi-Urjit Patel | पंतप्रधान मोदी RBI गव्हर्नरला म्हणाले होते, पैशाच्या ढिगार्‍यावर बसलेला साप, कोणी सांगितला प्रसंग…वाचा