Pune Kothrud Crime | पुणे : पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून तरुणावर चाकूने वार, महिलेवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Crime | उसने घेतलेले पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलावून घेत तरुणासोबत वाद घातला. तसेच शिवीगाळ करुन चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार कोथरूड परिसरातील महेश विद्यालयासमोर असलेल्या रोडवर मंगळवारी (दि.27) दुपारी दोनच्या सुमारास घडला. याबाबत राहुल दशरथ जाधव (वय-29 रा. उबरे ता. भोर) याने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे.

द्रौपदी काशीनाथ तेलोरे (वय-33 रा. सागर कॉलनी, कोथरुड) हिच्यावर आयपीसी 324, 504 नुसार गुन्हा दाखल करुन सीआरपीसी नुसार नोटीस देण्यात आली आहे. आरोपी महिलेने फिर्यादी राहुल याच्याकडून हात उसने 86 हजार रुपये घेतले होते. तुझे पैसे परत देते असे म्हणून आरोपी महिलेने राहुल याला बोलावून घेतले. पैसे घेण्यासाठी आल्यानंतर महिलेने त्याच्यासोबद वाद घलण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करुन चाकूने पाठीवर व मानेखाली वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Kothrud Crime)

वडापावचे पैसे मागितल्याने मारहाण

हडपसर : वडापाव व चहाचे पैसे किमी दिल्याने पैशांची मागणी केली असता तीन जणांनी वडापाव विक्रेत्याला
लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार फुरसुंगी येथील खुटवड चौकात घडला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महादेव वैजनाथ यादव (वय-45 रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे हर हर महादेव नावाचे हॉटेल आहे. आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये वडापाव व चहा पिल्यानंतर पैसे कमी दिले.
याबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”