Homeताज्या बातम्याPune Kothrud Sanskrutik Mahotsav | कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे 19 ते 22 एप्रिल...

Pune Kothrud Sanskrutik Mahotsav | कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे 19 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजन – मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Sanskrutik Mahotsav | माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) संचालित संस्कृती प्रतिष्ठानच्या (Sanskruti Pratishthan) वतीने येत्या 19 एप्रिल पासून कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे (Pune Kothrud Sanskrutik Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा कार्यक्रम भारतरत्न स्व. लता मंगेशकर (Bharatratna Lata Mangeshkar) यांना समर्पित करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

याप्रसंगी संगीतकार सलील कुलकर्णी (Music Composer Salil Kulkarni), विनोद सातव (Vinod Satav) आणि योगेश देशपांडे (Yogesh Deshpande) हे उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे यंदाचे 12 वे वर्ष आहे.
कोथरूड येथील आयडियल कॉलनी च्या मैदानावर 19 ते 22 एप्रिल दरम्यान दररोज संध्याकाळी 6 .30 वाजता हे कार्यक्रम सुरू होतील.
19 तारखेला चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. (Pune Kothrud Sanskrutik Mahotsav)

यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास तसेच लतादीदींनी 8 दशकात गायलेल्या गाण्याच्या कार्यक्रम होणार आहे.
यावेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णीं (Dr. Salil Kulkarni) हे पंडित हृदयनाथ मंगेशकर (Pandit Hridaynath Mangeshkar) यांची मुलाखत घेणार आहेत.
तर 22 एप्रिल ला शास्त्रीय गायन व वादनाचा तालब्रम्ह हा कार्यक्रम होणार आहे.
तौफिक कुरेशी, कौशिकी चक्रवर्ती, राकेश चौरसिया, पुरबायान चॅटर्जी हे सादरीकरण करणार आहेत.
प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा संस्कृती कलागौरव पुरस्कार पंडित शॉनक अभिषेकी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune Kothrud Sanskrutik Mahotsav | Kothrud Sanskrutik Mahotsav (Cultural Festival) to be held from 19th to 22nd April Muralidhar Mohol

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News