Pune Krushi Utpanna Bazar Samiti | वाघोलीतही शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरु करावा; बाजार समिती संचालक रामकृष्ण सातव पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Krushi Utpanna Bazar Samiti | वाघोली (Wagholi) हे पुणे शहराचे पुर्वेकडील मोठे उपनगर म्हणुन विकसित होत आहे. या भागातील नागरिकांना गुलटेकडी मार्केटयार्ड (Gultekdi Market Yard) येथील मुख्य बाजारपेठेमधील शेतीविषयक माल व इतर वस्तू खरेदीसाठी येणे जाणे सोयीचे होत नाही. या भागातील ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस आंबा रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी पणन मंडळाने शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरू करावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे संचालक रामकृष्ण सातव पाटील (Ramkrishna Satav Patil) यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक आणि बाजार समितीचे सचिव यांना याबाबत समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी निवेदन दिले आहे.(Pune Krushi Utpanna Bazar Samiti)

वाघोली, खराडी व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झालेले आहे. या भागातील नागरिकांना मार्वेâटयार्ड येथील मुख्य बाजारपेठेमधील शेतीविषयक माल व इतर वस्तू खरेदीसाठी येणे जाणे सोयीचे होत नाही. त्यामुळे या भागामध्ये विविध बाजारपेठा देखील विकसित होत आहेत. या भागामध्ये ग्राहकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस आंबा रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी थेट उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर वाघोली येथील बाजारतळाचे जागेमध्ये शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरू केल्यास या भागातील ग्राहकांना रास्त दरामध्ये आंबा उपलब्ध होईल. यामुळे आंबा उत्पादक शेतकर्‍यांनादेखील त्यांच्या आंब्यास रास्त भाव मिळेल, असे सातव पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : PF कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 10 लाखांची फसवणूक