पुणे : जमीनीच्या वादातून इसमाचा खून, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जमीनीचा वाद आपसात मिटवण्याचा बहाणाकरुन एका ५५ वर्षीय इसमाला दारु पाजून त्याचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली होती.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0930954f-b777-11e8-baa3-751de9c9126e’]
बाळासाहेब सोनबा मुरकुटे (वय-५५ रा. शिरसवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी योगेश मुरकुटे व भाऊसाहेब माळवदकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बाळासाहेब मुरकुटे आणि आरोपी यांच्या जमीनीचा वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ असून २९ ऑगस्टला शिवाजीनगर न्यायालयात याची तारीख होती. न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आरोपींनी संगनमत करुन बाळासाहेब मुरकुटे यांना हा वाद आपसात मिटवून घेऊ असे सांगितले. आरोपींवर विश्वास ठेऊन बाळासाहेब आरोपींसोबत सेलेरियो गाडीत बसले. आरपींनी गाडी लोणीकंद माथ्याजवळ व वडगाव बांडे याठिकाणी नेऊन बाळासाहेब यांना दारु पाजली. आरोपींनी मुरकुटे यांना बेदम मारहाण करुन भिमा नदीच्या पात्रात फेकून दिले. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B00SAX9X6G,B071W6FQPL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11a50adb-b777-11e8-9a24-e71905dfe3a6′]

दरम्यान, बाळासाहेब मुरकुटे हे शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून बेपत्ता झाले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दिली होती. शिवाजीनगर पोलीस त्यांचा तपास करत होते.

बाळासाहेब मुरकुटे यांचा मृतदेह १ सप्टेंबरला मांडवगण फराटा येथे भिमा नदीच्या पात्रात सापडला. या घटनेची शिरुर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना हा मृतदेह बाळासाहेब मुरकुटे यांचा असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास करत असताना हा अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचे समोर आले. पथकाने बाळासाहेब मुरकुटे यांच्याविषयी चौकशी केली असता, आरोपी आणि बाळासाहेब यांच्यात जमीनीचा वाद असून ते केस मागे घेत नसल्याने त्यांच्या वाद होते. पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
[amazon_link asins=’B077RV8CCY,B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’175b4aa7-b777-11e8-a29f-e98c658fa24a’]

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या सुचनेनुसार पोलीस उप निरीक्षक महेश मुंढे, दिलीप जाधवर, पोलीस हवालदार मुकुंद आयाचीत, चंदनशिव, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव, पोलीस नाईक विजय कांचन यांच्या पथकाने केली.