Pune Lashkar Crime | झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण करणार्‍यांना लष्कर पोलिसांकडून 8 तासाच्या आत अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lashkar Crime | कॅम्प परिसरातील (Pune Camp) दादुस स्वीट मार्ट येथून झोमॅटोची ऑर्डर घेवुन पार्क केलेली दुचाकी काढत असताना डिलीव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांच्या (Lashkar Police Station) तपास पथकाने अवघ्या 8 तासांमध्ये चौघांना अटक केली आहे.

सोहेल शेख (रा. मंगळवार पेठ), साहिल कुरेशी (226, मंगळवार पेठ), आयान शेख (रा. मंगळवार पेठ) आणि फैजान आश्पाक शेख (रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सदरील गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे करीत होते. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपी हे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

आरोपी फैजान आश्पाक शेख याला झोन-1 च्या पोलिस उपायुक्तांनी दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारी आदेशाचा भंग करून त्याने पुन्हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सुर्वे, व.पो.नि. नरेंद्र मोरे, महिला एपीआय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलिस हवालदार विलास शिंदे, महेश कदम, पोलिस अंमलदार लोकेश कदम आणि सागर हराळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sahakar Nagar Police | झोमॅटोची डिलीव्हरी करणार्‍या पिता-पुत्रास लुटणार्‍या तिघांना सहकारनगर पोलिसांकडून अटक

MIM On Congress | एमआयएमच्या माजी आमदाराचे काँग्रेसच्या वर्मावर बोट, आता भाजपाची बी-टीम कोण?

Congress Leader Vijay Wadettiwar | अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासंदर्भात वडेट्टीवार यांची धक्कादायक माहिती! ”चव्हाणांच्या मागे चौकशीचा फेरा…”

Shivsena Chief Uddhav Thackeray | अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, ”आदर्श घोटाळा लपवण्यासाठी…”

Ashok Chavan Resigned | अशोक चव्हाणांनी सोडला काँग्रेसचा हात, भाजपात जाण्याच्या चर्चेवर म्हणाले, ”येत्या दोन दिवसांत…”