Pune : प्रसिद्ध महाराजा हॉटेलात घुसून कोयत्याने वार करत दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पैश्यांच्या चणचण भासल्याने प्रसिद्ध महाराजा हॉटेलात घुसून कोयत्याने वारकरत दरोडा टाकणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. गेल्या महिन्यात मध्यरात्री हा प्रकार घडला होता.

सागर उर्फ नानुभई बबलू नाथू (वय 19), अनिल उर्फ जग्गु प्रमोद सोळखी (वय 20), सनी भरत पवार (वय 20) आणि विकास उर्फ तररी जितेंद्र मंडले (वय 20, रा. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात सागर उरसळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीचे पथक कारवाई करत होते. त्यावेळी हा गुन्हा नानु भाई व त्याच्या साथीदारांनी केला असून, सध्या ते खंडोबानगर येथे एकत्रित बसले आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पथकाचे अमोल गोरे, रामेश्वर धोडगे, श्रीकांत माळी, चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजू मोमीन व त्यांच्या पथकांने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांना पकडण्यात आले. तर नानुभाई यांच्याकडे गुन्ह्यातील मोबाईल मिळून आला आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत असून, साथीदारांचा शोध घेताला जात आहे.