Pune : महामार्गावर दरोडे टाकणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील 7 जणांना अटक, 5 कोटींचा ऐवज जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या कुविख्यातआंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलागकरून पकडले आहे. त्यांच्याकडून 5 कोटींचा ऐवज जप्त केला आहे. त्यांनी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडिसा, हरियाणासह इतर राज्यात गुन्हे केले आहेत.

दिनेश वासुदेव झाला (वय 50), सुशील राजेंद्र झाला, मनोज केसरसिंग गुडेन, मनोज उर्फ गंजा राजाराम सिसोदिया, ओमप्रकाश कृष्णा झाला, कल्याण सदुल चौहान आणि सतीश आंतरसिंग झांजा (सर्व रा. ओडगाव, जि. देवास, मध्यप्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जिल्ह्यातील महामार्गावर दरोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मेडिसिनचे कंटेनर लुटण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यावेळी पोलिसांना या दरोडा टाकणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यावेळी पोलीस देवास जिल्ह्यात गेले तेथे माहिती काढून या दरोडेखोरांचे फोटो आणि त्यांच्याबाबतची पूर्ण माहिती आणली. तसेच त्यांचा शोध सुरू केला. यावेळी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त घालत असताना चौफुला बाजूकडून शिरूरकडे एका ट्रकमध्ये जात असल्याचे दिसून आले. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ट्रक थांबवला नाही. मग पोलोसानी ट्रकचा पाठलाग केला. त्याचवेळी दुसरा ट्रक देखील न थाम्बता सुसाट गेला. मग पोलिसांनी पाठलाग केला. मात्र पुढे त्यांना ट्राफिक लागल्याने त्यांनी ट्रकमधून उड्या टाकून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना फिल्मी स्टाईलने पाठलागकरून पकडण्यात आले. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ट्रक जप्त केल्यानंतर त्यांच्याकडून 4 कोटी 51 लाख रुपयांच्या सिगारेट, दरोड्याच्या साहित्य तसेच इतर ऐवज असा ऐकून 4 कोटी 91 लाख 79 हजार रुपयांच ऐवज जप्त केला आहे.

दरोडेखोरांनी देशात धुमाकूळ घातला आहे. त्यानी महाराष्ट्रासोबतच अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून, अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होते.

ही कारवाई बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक दत्तत्रय गुंड, उपनिरीक्षक अमोल गोरे, दत्तात्रय गिरीमकर, दयानंद लिमन, राजू मोमीन यांच्या पथकाने केली आहे.