टोळीच्या वर्चस्वातून दसर्‍याच्या दिवशी तरूणाचा खून करणार्‍याला ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टोळी वर्चस्वातून ऐन दसऱ्याच्या दिवशीच तरुणाची निर्घृण खूनकरून पसार झालेल्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पौड परिसरात सहा महिन्यांपूर्वी खुनाचा प्रकार घडला होता.

मंहेश बाळासाहेब गावडे (वय 31 रा. लवळे ता.मुळशी जि.पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यात प्रतीक सातव याचा खून झाला होता. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापूर्वी काहीजणांना अटक केली आहे.

आरोपी व मयत एकाच भागातील आहेत. त्यांच्यात पूर्ववैमानस्य होते. तसेच टोळी वर्चस्व देखील होते. याचा राग मनात होता.

दरम्यान ऐन दसऱ्या दिवशीच आरोपीनी जुन्या भांडणाच्या कारण काढून प्रतीक याचा खून केला होता. यानंतर महेश हा पसार झाला होता. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याचा शोध घेत होते. यावेळी महेश हा लवळे येथील सिम्बाॅयसिस कॉलेजच्या मुख्य इमारतीजवळील डयुटी रुम येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. पोलीसांची चाहुल लागताच तो सिम्बॉयोसिस कॅम्पस शेजारील डोंगरात पळुन जावू लागला असता त्यास पाठलाग करून पकडण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्ता जगताप, पोलीस हवालदार रौफ इनामदार, लियाकत मुजावर, सुधीर अहिवळे, बाळासाहेब खडके यांनी केलेली आहे.