पुण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की, वाद सोडवताना घडली घटना 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महिलांचे सुरू असणारे भांडण सोडविण्यास गेलेल्या एका महिला उपनिरीक्षकाला धकाबुक्की केल्याची घटना दत्तवाडीत घडली. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी प्राणिता भाकरे यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात पिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता भाकरे या दत्तवाडी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. शनिवारी त्या ड्युटीवर असताना पानमळा वसाहतीत महिलांचे भांडण सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोन महिलांमध्ये जोरदार भांडणे सुरु होती. त्यामुळे प्रणिता यांनी मध्यस्तीकरीत त्यांचे भांडण सोडवून त्यांना समजावून सांगितले. त्याचा राग आल्याने एका महिलेने प्रणिता यांना शिवीगाळ करुन ढकलून दिले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अभंग करीत आहेत.