स्व. रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्रामार्फत ‘कायदेशीर’ जनजागृती अभियानाची सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्व. सुषमा स्वराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत खासदार गिरिष बापट, आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके यांच्या स्व. रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्रामार्फत कायदेशीर जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस. पी. कॉलेज) येथे या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

ह्या अभियान उद्घाटन पर्वामध्ये प्रभागातील ३ महाविद्यालये व ३ शाळा अशा एकूण ६ ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये हुजूरपागा वाणिज्य महाविद्यालय, एच. व्ही. देसाई महाविद्यालय, कन्या शाळा, रेणुका स्वरूप शाळा, अहिल्यादेवी शाळा या शाळांचा सहभाग होता.

संपूर्ण अभियाना अंतर्गत अ‍ॅड उज्ज्वला पवार (जिल्हा सरकारी वकील), अ‍ॅड. एस. के. जैन (ज्येष्ठ विधिज्ञ), अ‍ॅड. प्रमोद बेंद्रे (विधिज्ञ), पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (भरोसा सेल), अ‍ॅड. मोहन क्षीरसागर (निवृत्त जिल्हा न्यायाधीश), अ‍ॅड. शरद सूर्यवंशी, अ‍ॅड ईशानी जोशी, अ‍ॅड. मोहना गद्रे, अ‍ॅड. अनिषा फणसाळकर, प्राची कुलकर्णी (पत्रकार), रणरागिणी महिला बाऊन्सर ग्रुप च्या संस्थापिका मा. दिपाजी परब या मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

अभियानाला धीरज घाटे (सभागृह नेते, पुणे मनपा), स्मिता वस्ते (नगरसेविका, पुणे मनपा), स्वरदा बापट (भा.ज.यु.मो. प्रदेश उपाध्यक्षा), वैशाली नाईक (अध्यक्षा भाजपा महिला आघाडी, कसबा) तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा चे पदाधिकारी, कार्यकर्ते या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

प्रत्येक सहभागी शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचे उत्तम असे सहकार्यही मिळाले.