पाटस टोलप्लाझा जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील पाटस टोलप्लाझा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडल्याची माहिती वनपाल रज्जाक सय्यद यांनी दिली.

आपल्या सावजाच्या शोधामध्ये हा मादी जातीचा बिबट्या थेट महामार्गावर आल्याने त्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसून तो ठार झाला असावा असा अंदाज लावला जात आहे.

बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळताच वनपाल रज्जाक सय्यद, वनरक्षक कांबळे मॅडम, कर्मचारी कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह आपल्या ताब्यात घेत त्याचे पोस्टमार्टेम करून त्याचे दहन केले.

Visit : Policenama.com