Pune : इंदापूर, मुळशी, दौंड, पुरंदर, आंबेगाव, मावळ, वालचंदनगरमधील भेसळयुक्त ताडी विक्री करणार्‍या 12 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्या 12 विक्रत्यांचे (vendors) परवाने कायमस्वरुपी रद्द (permanent revocation licenses) करण्यात आले आहे. ताडीमध्य क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळयुक्त ताडी विक्री केली जात असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आले. भेसळयुक्त ताडी पिणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. rajesh deshmukh) यांनी 12 ताडी विक्री करणाऱ्याचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले. तसेच या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे (santosh zagde) यांनी दिली.

या कारवाई बाबत झगडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील मंजूर ताडी विक्री करणाऱ्यांकडून ताडी नमुन्यामध्ये क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळ केलेल्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील 16 विक्रेत्यांची तपासणी करुन नमुने ताब्यात घेतले. त्यानंतर हे नमुने मुंबई येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत जिल्ह्यातील 12 ताडी विक्रेत्यांच्या ताडी नमुन्यामध्ये क्लोरल हायड्रेट मिसळून भेसळ केल्याचे सिद्ध झाल्याची माहिती झगडे यांनी दिली.

कायमस्वरुपी परवाने रद्द व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या विक्रेत्यांची नावे

1. अशोक साहेबराव भंडारी – ताडी दुकान कळंब वालचंदनगर
2. चंद्रकांत हनुमंत शिंदे – इंदापूर
3. बसवराज बालप्पा भंडारी – मुळशी
4. सुरेश मिमराब भंडारी – दौंड
5. लक्ष्मीनारायण फकिरय्या गौड – इंदापूर
6. अविनाश प्रल्हाद भंडारी – पुरंदर
7. विजय गोपीनाथ भंडारी – इंदापूर
8. निलम साया गौड – मावळ
9. अमृता माणिक भंडारी – आंबेगाव
10. व्यंकटेश दस्तय्या कलाल – मुळशी
11. चंद्रकांत हनुमंत शिंदे – इंदापूर
12. राजशेखर आनंतराम गौड – इंदापूर