पुण्यात दारूच्या नशेत लाईन बॉय आणि त्याच्या मित्राचा राडा, महिला पोलिसाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विश्रांतवाडी भागात लाईन बॉय आणि त्याच्या मित्रांना दारूच्या नशेत तुफान राडा घालत सह पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केला. घटनास्थळी गेलेल्या महिला पोलीस त्यांना घरी जाण्यास समजावून सांगत असताना त्यांनाच धक्काबुक्की करत मी लाईन बॉय आहे, असे म्हणत तुला काय करायचे तर कर अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वैशाली अभंगराव यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश उर्फ टग्या जाधव (वय 25, रा. विश्रांतवाडी पोलीस लाईन) व सुबोध लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश उर्फ टग्या हा लाईन बॉय आहे. रविवारी रात्री विश्रांतवाडी पोलिस लाईनजवळ काही जण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची पोलीस ठाण्यात माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादी या तेथे गेल्या असाता त्यांना तिघेजण येथे गोंधळ घालत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी समजावून सांगत त्यांना घरी जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली.

तसेच त्यांना धकाबुक्की करत मी लाईन बॉय आहे तुला काय करायचे ते कर अशी धमकी दिली. त्यावेळी एकजण पळून गेला. त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल केला. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.