Pune : जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीला LCB कडून अटक

शिक्रापुर – रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी केलेल्या आरोपीला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असुन.सदरचा गुन्हा आरोपीने त्याचा अल्पवयीन साथीदार सोबत केल्याचे पोलिसांना सागितले

वैभव नारायण पवार (वय २५ रा. आमदाबाद फाटा मलठण रोड, आमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरचा गुन्हा आरोपीने त्याचा साथीदार अल्पवयीन असून त्याच्या सोबत केल्याचे पोलिसांना सागितले आहे.याप्रकरणी रमेश गोरख देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.२१.सप्टेंबर) रोजी रात्री सातच्या सुमारास फिर्यादी हे कारेगाव गावच्या हद्दीत कल्याणी कंपनी जवळून पायी जात असताना एक बिगर नंबर प्लेटच्या मोटरसायकल वरील दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून जबरी चोरी करून चोरून नेला होता.याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिला होता. त्यानुसार गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक राम धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर,पोलीस नाईक जनार्दन शेळके,पोलीस नाईक मोहम्मद अंजर मोमीन यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना त्यांना गोपनीय बातमी द्वारे माहिती मिळाली.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आमदाबाद फाटा (ता.शिरूर,जि.पुणे) येथे सापळा रचून आरोपीस शिताफिने पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता चोरीला गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली हिरो एक्स्ट्रीम मोटर सायकल (नंबर नसलेली) जप्त करण्यात आली. सदरचा गुन्हा आरोपीने त्याचा अल्पवयीन साथीदार सोबत केला असल्याची सांगितले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दिलीप शिंदे रांजणगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.