LCB पथकाची कारवाई : जबरी चोर्‍या करणारा आरोपी अटकेत

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने उघडकिस आणला असुन या प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(दि.९ सप्टेंबर) रोजी रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत फिर्यादी अरुण गवळी हे फोनवर बोलत असताना दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादीचा मोबाईल हिसकावुन चोरी केली होती.याबाबत रांजणगाव पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाच्या अनुशंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु केला असता,सहाय्यक फौजदार दत्ताञय गिरमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी दत्तात्रय विश्वनाथ भाकरे (वय.२०,रा. उचाळे वस्ती, टाकळी हाजी) यास ताब्यात घेउन चौकशी केली असता,आरोपीकडे चोरीला गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल मिळून आली.त्याचप्रमाणे इतर साथीदार बाबू बबन वाळुंज (रा.टाकळी हाजी,उचाळे वस्ती,ता.शिरूर),सोन्या गावडे (सध्या रा.जांबुत) यांनी गुन्हा केला असल्याचे सांगितले.

पकडण्यात आलेल्या आरोपीला गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व त्यात वापरलेल्या पल्सर मोटरसायकल सह रांजणगाव पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही करता हजर करण्यात आले आहे.हि कामगिरी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड,पोलीस नाईक जनार्दन शेळके यांनी.या गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करीत आहेत.