Lockdown in Pune :  पुणेकरांना दिलासा ! महापालिकेची आणि जिल्हा प्रशासनाची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या शहर आणि पुणे जिल्ह्यात काय सुरु, काय बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये लक्षणीय घट झाली आहे. पुणे (Pune) शहरात देखील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने देखील पुणेकरांना थोडासा दिलासा दिला आहे. आजपासून शनिवार रविवारचे पूर्ण लॉकडाऊनचे Lockdown आदेश शिथिल करण्यात आले आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी 7 ते 11 या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भातील सुधारीत आदेश जारी केले आहेत. त्यामुळे 14 एप्रिल पासून शहरात दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवार बंद असलेली अत्यावश्यक सेवा यापुढे मर्यादेत कालावधीसाठी सुरु ठेवता येणार आहेत.

या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
वैद्यकीय सेवांसह किराणा, भाजीपाला, फळविक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकानासह) यांचा समावेश आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने, चष्म्याची दुकाने यांचाही समावेश आहे.

हे बंद राहणार
– सर्व प्रकारची धार्मिक स्थळे
– स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय
– चित्रपट,मालिका, जाहिरातींचे शूटींग बंद राहील
– सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता) मॉल, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील
– सिनेमागृह, नाट्यगृह, ऑडिटोरियम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल आदी बंद राहील
– पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
– सर्व प्रकारचे धार्मिक, समाजिक, राजकीय, सांस्कृतिक  कार्यक्रम, सभा, आंदोलने

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय