4 दिवसात डिजीटल पाससाठी ९१ हजार नागरिकांचे अर्ज

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदी काळात गरजवंतासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल पासेससाठी तबल 91 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र पोलिसांनी केवळ 19 हजार 860 नागरिकांनाच हे पास दिले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जमावबंदी व वाहनबंदी केली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक पावले उचली आहेत. राज्यात संचारबंदी केली आहे. पुण्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदीत दवखील नागरिक बाहेर पडत असल्याने पुणे पोलिसांनी शहरात वाहनबंदी लागू केली आहे.

मात्र, जीवनाश्यवक सेवा, अत्यावश्यक वस्तू व नागरिकांना तातडीची आवश्यकता असल्यास बाहेर पडण्याची परवागी दिली जात आहे. त्यासाठी अडचणी शंका विचारण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक व इमेल आयडी दिले आहेत.

यानंतर पोलिसांनी नागरिकांना तात्काळ बाहेर पडणे आवश्यकत असल्यास त्यांना पुणे पोलिसांच्या www.punepolice.in या वेबसाईटवर सर्व तपशील भरून परवानगीसाठी अर्ज करावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. यात ज्यांना दररोज बाहेर पडणे गरजेचे आहे किंवा काही अडचण आहे अश्यांसाठी अर्ज भरल्यानंतर पास दिला जात आहे. त्यासाठी या वेबसाईटवर पूर्ण तपशील व कामाची माहिती द्यावी लागते. त्यांनतर सर्व माहिती पडताडून अर्ज मंजूर झाल्यास नागरिकांना क्यूआर कोड (QR Code) असलेला एक एसएमएस पाठविला जात आहे. तो कोड दाखविल्यानंतर त्यांना सोडले जाते.

यात भाजीपाला, किरणा, दूध, ग्लोसरी अशा गरजेच्या वस्तू पायी आणाव्यात. त्यासाठी पासची आवश्यकता नाही. नागरिकांनी अत्यावश्यक सुविधेसाठीच डिजीटल पाससाठी अर्ज करावा, असे आवाहन उपायुक्त बच्चन सिंग यांनी केले आहे. गरजू नागरिकांना मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डिजीटल पाससाठी चार दिवसात ९१ हजार ५८० नागरिकांनी अर्ज केले आहेत. पण, त्यापैकी अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून फक्त १९८६० जणांना डिजीटल पास दिले आहेत. तर ४७ हजार ४५२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर २४ हजार अर्ज् प्रलंबित आहेत.

पासेसची आकडेवारी
— 91 हजार 580 नागरिकांनी नोंद केली
— 19 हजार 860 जणांना पासेस दिले
— 47 हजार 452 परवानगी नाकारली
— 24 हजार 268 पेंडिंग आहेत.