Pune Lohegaon Airport | कोरोनाची संख्या वाढली, प्रवासी संख्या घटली ! पुण्यातील दररोज उड्डाण होणारे 20 ते 25 विमाने रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lohegaon Airport | मुंबई पुण्यासह राज्य आणि देशभरात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढतो आहे. दैनंदिन कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही (Maharashtra Government) राज्यात काही निर्बंध लागू केले आहेत. तर कोरोना संसर्गाचा फटका हवाई क्षेत्राला देखील बसताना दिसत आहे. पुणे लोहगाव विमानतळावरून (Pune Lohegaon Airport) दररोज उड्डाण होणारे साधारण वीस त पंचवीस विमाने रद्द होत आहेत. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी होते आहे. यामुळे दुसरीकडे विमानसेवा देणाऱ्या कंपन्या विमाने रद्द करताना दिसत आहे.

 

मागील काही दिवसांआधी दररोज 70 ते 75 विमानांची होणारी वाहतूक आता 40 ते 45 इतकी झाली आहे. रद्द होणाऱ्या विमानांमध्ये दिल्ली, जयपूरला जाणाऱ्या विमानांचा जादा समावेश आहे. एकिकडे विंटर शेड्युल आहे. या हंगामात सर्व प्रवासी पर्यटनात गुंतलेले असतात दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रवासी संख्या घटताना दिसत आहे. तर, काही विमानाचे अवघे 5 ते 7 इतकेच बुकिंग झाल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या ते विमान रद्द करीत आहेत. (Pune Lohegaon Airport)

दरम्यान, पुण्यातून (Pune News) उड्डाण करणारे दररोजचे साधारण 20 ते 25 विमाने रद्द होत आहेत.
त्यामुळे त्याचा इतर गोष्टींवरही परिणाम जाणवत आहे.
नुकतंच पुणे विमानतळाहून प्रवास करणाऱ्यांचा आकडा साधारण 17 ते 18 हजार झाला होता.
आता मात्र 11 ते 13 हजार इतका झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, पुणे विमानतळाचे संचालक संतोष डोके (Santosh Doke) म्हणाले, ”काही दिवसांपासून प्रवासी संख्या कमी होत असल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या आपले उड्डाण रद्द करीत आहेत.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे ते म्हणाले.”

 

Web Title :- Pune Lohegaon Airport | corona covid 19 increase pune city plane canceling 20 25 daily flights pune lohegaon airport

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा