Pune Lohegaon International Airport | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘समर शेड्यूल’, प्रथमच 200 हून अधिक प्रवासी उड्डाणांना हवाई दलाची परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (लोहगाव) आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (Pune Lohegaon International Airport) उन्हाळी हंगाम (समर शेड्यूल-Summer Schedule) येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. या हंगामात हवाई दलाने (Air Force) सोमवार ते शुक्रवार 218 प्रवासी उड्डाणांना परवानगी दिली आहे. तसेच या हंगामात पुण्यातून नव्याने मुंबई (Mumbai) आणि वाराणसी (Varanasi) या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरु होत असल्याची माहिती विमानतळाचे (Pune Lohegaon International Airport) संचालक संतोष ढोके (Director Santosh Dhoke) यांनी दिली आहे.
रविवारी हवाई दलाने 247 उड्डाणांना परवानगी दिली असली, तरी विमानतळ प्राधिकरणाने (AAI) मात्र 207 विमानाच्या उड्डाणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात पुणे विमानतळावरुन (Pune Lohegaon International Airport) पहिल्यांदाच 200 पेक्षा जास्त विमाने भरारी घेणार आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सध्या 180 ते 190 उड्डाणे होत असून 28 ते 30 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. विमानतळाचा उन्हाळी हंगाम 26 मार्चपासून सुरु होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. हा हंगाम 28 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे.
हवाई दलाकडून सोमवार ते शुक्रवार 218 उड्डाणांना परवानगी दिली असली तरी 195 उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. तर शनिवारी 218 उड्डाणांपैकी 164 उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दुबई (Dubai), सिंगापुर (Singapore), बँकॉक (Bangkok) या देशांसाठीची सेवा देखील सुरू राहणार
Web Title :- summer-schedule-of-pune-lohegaon-international-airport-will-start-from-march-26
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update