Pune Lok Sabha | 190 ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा ! ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha | आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या राज्याचा चौदा वर्ष त्याग केला. माता शबरीची उष्टी बोरं खावून तिचा सन्मान केला. ज्येष्ठांचा आदर, सन्मान करा हाच धडा रामायणातून आपल्याला मिळतो. त्यामुळेच ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती आहे. पुण्यातील ज्येष्ठ, वडिलधारे हेच माझे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या मोदी सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु, असे महायुतीचे (Mahayuti) पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले.(Pune Lok Sabha)

ऑस्कॉप, फेसकॉम, भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी आणि पुणे शहरातील सर्व १९० अंगीकृत ज्येष्ठ नागरिक संघांनी मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला. या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मोहोळ बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांच्या ॲस्कॉप संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, कार्याध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ, कोषाध्यक्ष अच्युत कुलकर्णी, सचिव ऊर्मिला शेजवलकर, तसेच उदय रेणूकर, अरुण रोडे, राजीव कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांनी मेळावा आयोजनात मोलाची भूमिका बजावली. हेल्पेज इंडिया संघटनेचे वसंतराव दापोरकर, बंडोपंत फडके, अनिल कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, सुरेखा पेंडसे, ऊषा जोईल, श्रद्धा चिटणीस आदीही उपस्थित होते.

आपल्या घरातील ज्येष्ठ किंवा वडिलधारे आपली ताकद असते असे सांगून मोहोळ म्हणाले, ‘आपल्याला कधी ना कधी तरी निराशा येते. त्यावेळी घरातील ज्येष्ठांशी संवाद साधल्यानंतर आपले नैराश्य दूर होते, हा माझा अनुभव आहे. अनेकदा मला गोंधळलेल्या मनस्थीतीत मला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून त्यातून बाहेर पडणे शक्य झाले आहे. हे मी माझे अनुभव सांगतोय. भाजपने कायमच ज्येष्ठ नागरीकांची दखल घेतली आहे. कारण ज्येष्ठ नागरीक हे समाजातील अनुभवाची भांडारे आहेत. ज्येष्ठ, वडिलधारे माझ्यासाठी कायमच आदरणीय राहिले आहेत, पुढही रहातील. कोरोना काळात ज्येष्ठांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले, त्यांच्या त्या आशिर्वादानेच मला या निवडणुकीत संधी मिळाली. त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी मोठा आहे. सर्वांशी कायमच गप्पा मारणारे, बोलणारे ज्येष्ठ नागरीक हेच खरे माझे स्टार प्रचारक आहेत.’

यावेळी पुणे शहरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांसह राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी,
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी,
शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन थोरात, महायुतीचे समन्वयक शाम देशपांडे, ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे समन्वयक
बाळासाहेब टेमकर, कोथरूड दक्षिण मंडलचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर,
माजी नगरसेविका उर्मिला आपटे, माजी उपमहापौर नाना नाशिककर, अनुपमा लिमये, कोथरूड सरचिटणीस अनुराधा येडके,
मंजूश्री खर्डेकर, मनसे विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, रिपाइंचे कोथरूड अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ,
शिवसेनेचे कोथरूड विभाग प्रमुख मयूर पानसरे, दीपक पवार, गिरीश खत्री, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, राहुल कोकाटे,
कोथरूड उपाध्यक्ष दिनेश माझिरे, अजित जगताप आदी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी