Pune Lok Sabha Bypoll Election | पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीबाबत जयंत पाटलांचे मोठं विधान, म्हणाले-‘प्रशांत जगताप…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असताना भाजपचा उमेदवार कोण असणार? यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघ कँग्रेसच्या ताब्यात असून यावर आता राष्ट्रवादीने दावा केला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर (Pune Lok Sabha Bypoll Election) मोठं विधान केलं आहे.

 

जयंत पाटील म्हणाले, प्रशांत जगताप (Prashant Jagtap) हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत यासंदर्भात आम्ही चर्चा करु, असं वक्तव्य जंयत पाटील यांनी केले आहे. जयंत पाटलांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता लोकसभा पोटनिवडणुकीच (Pune Lok Sabha Bypoll Election) वारे सध्या वाहायला लागले आहे. भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला दोन आठवडे उलटल्यानंतर उमेदवारीवरुन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेसच्या ताब्यातील या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर जगताप यांनी तसे कॅम्पेनिंग सुरु केले आहे.
दोन दिवसांपूर्वी जगताप यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेलं पोस्ट व्हायरल झालं होतं.

काँग्रेस जागा राखणार?
काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केल्यानंतर काँग्रेसकडून पुण्याची जागा काँग्रेसच लढवेल असं जाहीर केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर आणि मावळ हे इतर तीन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने
पुणे हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे.
त्यावर आता राष्ट्रवादीने दावा केल्याने हा मतदारसंघ आपल्याकेड राखणं काँग्रेससाठी महत्त्वाचे बनलं आहे.
या पोटनीवडणुकीत काँग्रेसकडून अरविंद शिंदे (Arvind Shinde)
आणि मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

Web Title :- Pune Lok Sabha Bypoll Election | pune bypoll jayant patil talk about prashant jagtap candidate for pune by poll election after mp girish bapat death

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट

Maharashtra Politics News | भगवान गडावर राजकीय वाद, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात खडाजंगी