Pune Lok Sabha Bypoll Election | कर्नाटक निवडणुकीनंतर 4200 EVM मशीन पुण्यात दाखल, लवकरच लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बाबट (BJP MP Girish Babat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून (Pune District Election Department) पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा निवडणूक आयोगाने (District Election Commission) 17 दिवसांपूर्वी तयारीला सुरुवात केली आहे. मतदार याद्या अद्यावत करणे, मतदान केंद्राचे स्थान निश्चित करण्याची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे लवकरच पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll Election) कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप (BJP), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) गोटात हालचालींना वेग आला आहे.

 

कर्नाटक विधानसभेची निवडणूक (Karnataka Assembly Elections) झाल्यानंतर निवडणूक आयोगाने EVM मशीन पुण्यात पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 4220 ईव्हीएम मशीन (EVM Machine) आणि 5070 व्हीव्हीपॅट मशीन (VVPAT Machine) बंगळुरुहून पुण्यात पाठवण्यात आल्या आहेत. या मशिन्सची सेटिंग आणि चेकिंग करण्यासाठी 30 इंजिनियर्सची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी (दि.24) या मशिन्सच्या सेटिंग आणि चेकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मशिनवर पुणे बाय इलेक्शन असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

 

प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी झाली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll Election) कधी जाहीर होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी (दि.26) पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) तयारी झाल्याचे पत्र पाठवले जाणार आहे. यानंतर निवडणूक आयोग पुणे लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात लवकरच पुन्हा एकदा प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

 

इच्छुकांची संख्या मोठी

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट (Swarda Bapat), संजय काकडे (Sanjay Kakade),
माजी महापौर मुरलीधर मोहोळ (former Mayor Muralidhar Mohol), जगदीश मुळीक (Jagdish Mulik)
आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Kothrud Former MLA Medha Kulkarni) यांच्या नावाची चर्चा आहे.
तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे (Arvind Shinde), मोहन जोशी (Mohan Joshi),
रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची चर्चा आहे.
परंतु या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला जाते
आणि भाजप कोणाला उमेदवारी देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

Web Title :  Pune Lok Sabha Bypoll Election | pune loksabha bypoll likely declared very soon
preparations of bypoll done by pune district election administration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा