Pune Lok Sabha Bypoll Election | ‘…तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, मनसे नेते वसंत मोरेंचं मोठं विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या या जागेसाठी भाजपसह काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) अनेक इच्छुक उमेदवार आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु झाली असताना मनसे (MNS) देखील मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll Election) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Pune Lok Sabha Bypoll Election) मनसेकडून आपला हुकमी एक्का फायरब्रँन्ड नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी मनसे सैनिक करत आहे. तर पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी हे मोठं विधान केलं आहे.

 

वसंत मोरे म्हणाले, पक्षाने जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे. 2017 ची पुणे महानगरपालिकेची निवडणूक (Pune Municipal Corporation (PMC) पाहिली तर मध्यमवर्गीय उमेदवार होते, तरीपण पुणे शहरातील मतदान पाहता 3 लाख79 हजार मतं आहेत. पोटनिवडणुकीत कोण मोठा तुल्यबळ नेता धाडस करणार आहे. मनसे कार्यकर्ता जर कामाला लागला तर चमत्कार घडू शकतो असेही वसंत मोरे म्हणाले.

पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला.
यावर बोलताना ते म्हणाले, निवडणूक लढवण्यासाठी इच्छा का नसावी? माझं काम चांगलं आहे.
राजकारणात असेल तर मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. निवडणूक लागली तर मी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्याशी बोलेन.

 

Web Title :  Pune Lok Sabha Bypoll Election | ‘…Then I will contest the Pune Lok Sabha by-election’,
MNS leader Vasant More’s big statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा