Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा पोटनिवणुकीवरुन मविआत वादाची ठिणगी? जयंत पाटलांची संयमाची भूमिका; म्हणाले- ‘कुणाची ताकद…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजप खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या एका जागेसाठी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चढाओढ पाहायला मिळत आहे. मोठा भाऊ या नात्याने राष्ट्रवादीने (NCP) या जागेवर दावा ठोकला आहे. जिंकेल त्याची जागा असं सूत्र संजय राऊतांनी (Sanjay Raut) स्पष्ट केलं आहे. तर काँग्रेसने (Congress) देखील या जागेवर (Pune Lok Sabha Bypoll Election) दावा केल्याने मविआतील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संयमाची भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे, कसेल त्याचीच जमिन या प्रमाणे, जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर ‘कसबा’ प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणुक (Pune Lok Sabha Bypoll Election) महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. (Maharashtra Politics News) जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान (Constitution) आणि लोकशाही (Democracy) वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल असे म्हटले आहे.
अजित पवारांची भूमिका काय?
सातत्याने निवडणुकीला उभे राहिल्यानंतर तिथे जे पराभूत होत आहेत, असं असेल तर तिथे त्यांच्या मित्रपक्षांपैकी कुणाची ताकद असेल तर त्याला ती जागी दिली पाहिजे. अर्थात, अजून ते अंतिम झालेलं नाही. ती जागा (पुणे लोकसभा मतदारसंघ) आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते.
जयंत पाटलांची संयमी भूमिका
संजय राऊत आणि अजित पवार यांच्या वादावर जयंत पाटील यांनी संयमाची प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधक एकत्र येतील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल. वेगवेगळे नेते आपआपल्या परीने बोलत असतात.
याचा अर्थ तो वाद आहे असं होत नाही. एकत्र बसले की आमचे सगळे वाद मिटतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
ते सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र सदनातील घटनेवरुन सरकारवर टीकास्त्र
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar)
आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुतळे हटवल्यावरुन जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
सावरकरांचा (Swatantra Veer Savarkar) कार्यक्रम करण्यास आमचा विरोध नाही.
मात्र, अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील द्वेष दिसला. या दोन महिला कर्तबगार महिला,
ज्यांनी देशासमोर आदर्श ठेवला. आज महिला शिकलेल्या आहेत, त्याचं सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जातं.
संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे की सरकारच्या मनात या दोन घटकांबद्दल काय भूमिका आहे ती, असे जयंत पाटील म्हणाले.
Web Title : Pune Lok Sabha Bypoll Election | who will contest the seat of pune jayant patils suggestive reaction to sanjay raut ajit pawar controversy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Palkhi Sohala 2023 | उष्माघातापासून संरक्षणासाठी पालखी मार्गावर 27 ठिकाणी उभारण्यात येणार मंडप
Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?