Pune Lok Sabha Election 2024 | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार; पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), मनसे (MNS), आरपीआय (RPI- A) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार असल्याची माहिती आज महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar), शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale), मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनावणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राजाभाऊ कांबळे, लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, लहुजी शक्ती सेनेचे नितीन वायदंडे, शिवसंग्राम पक्षाचे शहराध्यक्ष भरत लगड,, प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) या वेळी उपस्थित होते.

घाटे म्हणाले, कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पदयात्रेचा समारोप केला जाईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय मंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Athawale Ramdas) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत. शिरूर लोकसभेचे (Shirur Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हेही या सभेला उपस्थित राहणार आहेत.(Pune Lok Sabha Election 2024)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सभा आयोजित केल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

मानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केलेला आहे निवडणुकीसाठी वातावरण खूप चांगले आहे.
मुरलीधर मोहोळ हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी पुणेकरांची सेवा केली.
समाजासाठी जीवनदान देणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास आहे.
बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), मावळ मतदार संघातील
(Maval Lok Sabha) शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne), पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा होणार असून, त्याला चारही मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळेल.

मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर म्हणाले, रॅलीच्या नियोजनासाठी आम्ही सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये नियोजन करीत आहोत.
27 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मुरलीधर मोहोळ हे अभ्यासू आणि चांगले उमेदवार असून, पुणेकरांच्या आवडीचे उमेदवार आहेत.
त्यामुळे ते मताधिक्याने विजयी होतील.ही रॅली ही महायुतीच्या विजयाची नांदी असेल असे सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले
तसेच महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एक दिलाने काम करून उमेदवार विजयी करतील असा विश्वास ही यावेळी सर्व
पक्षाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lonikand Pune Crime | पुणे : विवाहितेला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करुन बदनामी करण्याची धमकी

Pune News | छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन