Pune Lok Sabha Election 2024 | सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत मुरलीधर मोहोळांचा जोरदार प्रचार, म्हणाले -”पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी सर्वप्रथम उमेदवारी जाहीर झालेले भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचारात चांगलाच जोर पकडला आहे. सोशल मीडियावर तरुणांसाठी रिल्स तर ज्येष्ठांसाठी घरोघरी जाऊन भेटीगाठी देण्यावर मोहोळ यांनी भर दिला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मोहोळ विविध मार्गाने प्रचार करत आहेत. हर घर मोदी परिवार अभियानाच्या माध्यमातून मोहोळ यांनी लक्षवेधक प्रचार केला आहे.

भाजपच्या ४४व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘हर घर मोदी परिवार’ (Har Ghar Modi Pariwar) या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी १० हजार कार्यकर्त्यांनी १० लाख मतदारांपर्यंत मोदींचा नमस्कार पोहोचवला. या अभियानात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी सहभागी झाले होते.(Pune Lok Sabha Election 2024)

या अभियानाबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७०वे कलम हटविले, पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले, ८० कोटी जनतेला मोफत धान्य, १२ कोटी शौचालयांची बांधणी, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या मोदी सरकारच्या महत्त्वाच्या कामांची आम्ही मतदारांना माहिती दिली.

बावनकुळे म्हणाले, विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत.
त्याला पुणे शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मोदींनी दहा वर्षे केलेले काम आणि विकसित भारताचा संकल्प यामुळे जनता कमळ चिन्हाचे बटन दाबून तिसऱ्यांदा
मोदींना पंतप्रधान पदाची संधी देईल.

तर भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून मी जनसेवेचे व्रत घेतले आहे.
महायुतीने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दहा वर्षात देश विकसित भारताच्या दिशेने प्रगती करत आहे.

मोहोळ पुढे म्हणाले, विकसित पुण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात शहरात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले आहे.
पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
त्यासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन मोहोळ यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | अखेर साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांनी सोशल मीडियावरून ‘हे’ नाव केले जाहीर

Pimpri Police Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरवर छापा! वाकडमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 3 तरुणींची सुटका (Video)

Baramati Lok Sabha Eelction 2024 | बारामतीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी मैदानात?, पंतप्रधानांच्या सभेसाठी नेत्यांचे प्रयत्न, ‘या’ ठिकाणी होऊ शकते प्रचारसभा