Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभेचा प्रचार करायचा की पक्षांतर्गत वाद मिटवायचे? रवींद्र धंगेकर हैराण, काँग्रेसची कसरत, शहर आघाडीतही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटींच्या माध्यमातून धुमधडाक्यात प्रचार चालवला आहे. सहाही विधानसभा मतदार संघात नियोजनपूर्वक प्रचार सुरू आहे. तर इकडे काँग्रेसच्या उमेदवाराला पक्षांतर्गत वादाचा सामना करावा लागत असल्याने त्याचा निवडणूक प्रचारावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. शहरातील आघाडीत (Mahavikas Aghadi) देखील सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही.(Pune Lok Sabha Election 2024)

काँग्रेसमध्ये कुरघोड्यांच्या राजकारणामुळे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हैराण असल्याचे आहेत. उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये उफाळलेली नाराजी, त्यानंतर मेळाव्यात रंगलेले नाराजी नाट्य आणि आता पद वाटपावरून वाद सुरू आहे. हा गोंधळ शांत करण्यात धंगेकर यांची शक्ती वाया जात आहे.

एकुणच या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसला (Congress) कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील आणि कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकरांना ग्रासले आहे.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीमध्ये सर्वांनी एकदिलाने काम करून रवींद्र धंगेकर यांना निवडून आणण्याचा निश्चय केला होता. मात्र, दोनच दिवसांत पक्षांतर्गत कुरघोड्यांची चर्चा सुरू झाली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस ओबीसी सेलचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे (Prashant Surse) यांची बुधवारी शहर व प्रदेश पातळीच्या शिफारशीवरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर प्रदीप परदेशी (Pradeep Pardeshi) यांची नियुक्ती करण्यात आली.

यानंतर सुरसे यांच्या गटाने थेट दिल्लीतील कॉंग्रेसच्या अखिल भारतीय ओबीसी विभागाचे सरचिटणीस राहुल यादव (Rahul Yadhav) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने आदेश काढून सुरसे यांची या पदावर पुनर्नियुक्ति केली आणि वाद आणखी वाढला.

या झाल्या काँग्रेस पक्षांतर्गत कुरघोड्या पण पुण्यातील महाविकास आघाडीत देखील कुरापती सुरूच आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत कसबा विधानसभा (Kasba Vidhan Sabha) शिवसेनेला (Shivsena) सोडणार, असा शब्द द्या, तरच धंगेकरांचा प्रचार करू अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी घेतली होती.

तर मध्यंतरी केसरीवाडा (Kesari Wada) येथील बैठकीत ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार दिला, तेच आता मोदीविरोधक म्हणून आमच्याशेजारी बसणार असतील, तर आम्हाला हे मान्य नाही, असे म्हणत एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने बैठक सोडली होती.

त्यानंतर झालेल्या एका बैठकीच्या बॅनरवर नेत्याचा फोटो लावला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली होती.

तसेच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांचा प्रचार करू नका, अशा सूचना दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिल्या होत्या. यानंतर सारवासारव करत शिवसेना ठाकरे गटाच्या या शहराध्यक्षांनी म्हटले होते की, पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे काम जोमाने सुरू आहे. शिवसेना प्रचारामध्ये सहभागी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election In Maharashtra | बारामती, रायगडसह 11 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू; 7 मे रोजी मतदान

Mundhwa Pune Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढले, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार