Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi – VBA) पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, ना मिरवणूक, ना ढोलताशे, ना सभा, अशाप्रकारे मोरे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Collector Office) उमेदवारी अर्ज दाखल केला. नेहमी प्रसिद्धी माध्यमांच्या समोर असणाऱ्या या उमेदवाराने गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल का केला, याची चर्चा सध्या शहरातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Pune Lok Sabha Election 2024)

लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या वसंत मोरेंना मनसेने उमेदवारी नाकारल्यानंतर मोरे यांनी मनसेला (MNS) कायमचा रामराम केला होता. यानंतर ते महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi – MVA) उमेदवारी मिळते का, याची चाचपणी करत होते. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचीही अनेकदा भेट घेतली. मात्र, काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी मिळाल्याने मोरे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. पण मराठा उमेदवार उभे करणार नाही, असे जरांगे यांनी अचानक जाहीर केले. (Pune Lok Sabha Election 2024)

यानंतर मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना भेटण्यासाठी राजगृहावर गेले होते.
येथे मात्र वसंत मोरेंना चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर काहीदिवसातच वसंत मोरेंना वंचितने अधिकृत उमेदवारी जाहीर केली.

मात्र, वंचितने मोरे यांच्यावर इतका विश्वास दाखवूनही मोरेंचा ओढा अजूनही मनसे, राज ठाकरे (Raj Thackeray),
शर्मिला वहिनी यांच्याकडेच असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. मी त्यांना भेटणार, मनसेने मला पाठिंबा द्यावा, अशी वक्तव्य वसंत मोरे आहेत.

मोरे यांनी पुण्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. परंतु, इतरवेळी सोशल मीडियावर नेहमीच चमकणारे मोरे यांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात