Pune Lok Sabha Election | कोथरुड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारत निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत (Pune Lok Sabha Election) खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक कमलेश मखवाना यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Vidhan Sabha) निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवण्यासह विविध पथकांच्या माध्यमातून निवडणुकीत पैसे, दारू आदींच्या अवैध वापरावर लक्ष ठेवावे असे निर्देश त्यांनी दिले. गलांडे, तहसीलदार अंजली कुलकर्णी, सहायक खर्च निरीक्षक अस्मिता देशमुख, स्वप्निल खोल्लम आदी उपस्थित होते.(Pune Lok Sabha Election)

मखवाना यांनी मतदारसंघात पाषाण-सुस रोड येथील वरदायिनी सोसायटीजवळ उभारलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट दिली. निवडणुकीशी संबंधित उमेदवाराकडून होणाऱ्या खर्चाबाबत वाहनांची योग्यरीत्या तपासणी करून सर्व वाहनांची तपासणी करताना व्हिडिओग्राफी करावी, अवैधरित्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर कडक लक्ष ठेवण्यात यावे, मतदार संघात अंतर्गत भागात वाटप होणाऱ्या हस्तपत्रिका बाबत माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीमार्फत विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मखवाना यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन कक्षातील कामकाजाचा आढावा घेतला.
एक खिडकी कक्ष, आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष यांचे कामकाज तपासून कामाबाबत समाधान व्यक्त केले.
सर्व बाबतीत सहायक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, असेही त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत