Pune Lok Sabha | पुण्यात मुरलीधर मोहोळांनी उडवला प्रचाराचा धुरळा, पहिला राऊंड पूर्ण! सहाही मतदारसंघात नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे (Mahayuti) भाजपाचे (BJP) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. पुणे शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भेटीगाठींवर त्यांनी भर दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच त्यांचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कायकर्ते मोहोळ यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे दिसत आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच प्रचारात आघाडी घेतली आहे. ते सुरूवातीलपासून मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती, पक्षाचे जुने कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेत आहेत. विविध संस्था, संघटनांच्या मेळाव्यांना उपस्थित राहात आहेत. तसेच त्यानंतर सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधण्यासाठी दाट लोकवस्तीच्या परिसरात पदयात्रा करत आहेत.

(Murlidhar Mohol) मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड (Kothrud Vidhan Sabha), पर्वती (Parvati Vidhan Sabha), शिवाजीनगर (Shivaji Nagar Vidhan Sabha), वडगाव शेरी (Vadgaon Sheri Vidhan Sabha), कसबा (Kasba Vidhan Sabha) आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील (Pune Cantonment Vidhan Sabha) दाट लोकवस्तीच्या भागात मतदार संवाद पदयात्रा काढल्या. या पदयात्रांमध्ये महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते.

मुरलीधर मोहोळ या गाठीभेटींमधून नागरिकांशी थेट संपर्क साधत आहेत.
विविध समाजघटक मोहोळ यांचे ठिकठिकाणी स्वागत करत आहेत.
कार्यकत्र्यांच्या घोषणा, झेंडे, यामुळे निवडणुकीच्या वातावरणात रंग भरला आहे.

सर्व मतदार संवाद पदयात्रांमध्ये महायुतीतील पक्षाचे शहराध्यक्षांसह धीरज घाटे, आमदार, खासदार, माजी नगरसेवक,
संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत होते.

सोशल मीडियावर देखील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत.
हा प्रचार करताना तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर केला जात असल्याने, युवा वर्गासाठी ते खास आकर्षण ठरत आहे.
युवा वर्गाचा देखील यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, सहाही विधानसभा मतदारसंघात पुणेकरांचा मिळालेला
प्रतिसाद मलाही भारावून टाकणारा होता. ठिकठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागत हे महायुती आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
यांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे, अशी माझी भावना आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, विशेष म्हणजे मोदीजींची समाजाच्या सर्व घटकांत असलेल्या विश्वासाची पावतीही पदोपदी मिळाली.
महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही पदयात्रेत महायुती म्हणून पुणेकरांसमोर गेल्याने महायुतीतील प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधित्व
यात पाहायला मिळाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार; पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा

Pune Crime Branch | पुणे पोलिसांचे सराईत गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर; सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये गोळीबाराचा थरार !

Aaditya Thackeray On BJP | आदित्य ठाकरेंचा सवाल, म्हणाले – ”शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, गोळ्या चालवल्या, त्या भाजपाला मत देणार का?”