Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha | महायुतीचे (Mahayuti) भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शहरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचारसभा होणार आहे. यावेळी भाजपाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाऊ शकते.(Pune Lok Sabha)

मोहोळ यांच्यासाठी गुरुवारी होणारी ही प्रचारसभा नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळील (Omkareshwar Temple) जागेत होणार आहे. सभेची जोरदारी तयारी सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खडकवासला (Khadakwasla) येथील निवडणूक कार्यालाच्या उद्घाटनप्रसंगी नदीपात्रात सभेची माहिती दिली होती. गुरुवारी मुरलीधर मोहोळ यांनी निवडणूक अर्ज भरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ते सभेच्या ठिकाणापर्यंत भव्य रॅली काढण्यात येईल. रॅलीचा समारोप नदीपात्रात होईल. यानंतर सभा होईल.

पुणे शहरात होत असलेल्या या प्रचारसभेला राजयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde),
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीचे इतर
नेते उपस्थित राहतील. महायुतीच्या बारामतीच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar),
शिरूरचे (Shirur Lok Sabha) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि मावळचे (Maval Lok Sabha) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) देखील सभेला उपस्थित राहणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : प्रेमसंबंधातून महिलेचा खून, आरोपीला काही तासात गुन्हे शाखेकडून अटक (Video)

Health Insurance | मोठा निर्णय! आता हेल्थ इन्श्युरन्ससाठी नाही वयाचे बंधन, आजारी व्यक्तीही घेऊ शकतात विमा, 65 वर्षांची वयोमर्यादा हटवली