Pune Lok Sabha | पुणे: निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांची माध्यम कक्षाला भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha | जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Collector Office) माध्यम संनियंत्रणासाठी स्थापित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष, निवडणूक खर्च समिती कक्ष व सी-व्हिजील कक्षास पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर (Prasad Lolayekar IAS) यांनी भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase IAS), उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर (Meenal Kalaskar), सी-व्हिजील कक्षाच्या समन्वयक अधिकारी ज्योती कावरे (Jyoti Kavre) उपस्थित होत्या.(Pune Lok Sabha)

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तीनही कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सीव्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

निवडणूक निरीक्षक श्री.लोलयेकर यांनी माध्यम कक्षात इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत व समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, पेड न्यूज यावर अंकुश ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामाकाजाची, तसेच खर्च समिती व सी-व्हिजील कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू