Pune Lokmanya Festival | नवरात्र उत्सवातील ‘पुणे लोकमान्य फेस्टिवल’मधील कार्यक्रम ऑनलाइन पाहता येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पूर्णपणे कमी झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकमान्य फेस्टिवल मधील (Pune Lokmanya Festival) नवरात्रीचे कार्यक्रम ऑनलाइन दाखवण्यात येणार आहे. पुणे लोकमान्य फेस्टिवलचे (Pune Lokmanya Festival) आयोजन शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या या उत्सवाकडे ‘समाज भावनांचा उत्सव’ म्हणून पाहिले जाईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. गणेश सातपुते (Adv. Ganesh Satpute) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

यंदाच्या वर्षी या उत्सवामध्ये सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, सांस्कृतिक, राजकारण, कला, साहित्य, मनोरंजन, वारसा या विषयांवर विविध व्याख्याने, चर्चा होणार आहेत. यामध्ये पुणे शहर तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्याक, लोकप्रतिनीधी, पत्रकार यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रामुख्याने तीन सदस्यीय प्रभाग पद्धती, अंबिल ओढा (Ambil Odha) कथा एक-व्यथा अनेक, तळजाई टेकडी विकास की..?, जागर स्त्री शक्तीचा इत्यादी प्रश्नावर चर्चासत्र होणार आहे.

याशिवाय तरुण-तरुणींना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये सोलो डान्स (Solo Dance), ग्रुप डान्स (Group Dance), कपल दांडीया (Couple Dandiya), रॅप साँग (Rap Song), मेहंदी, रांगोळी, नेल आर्ट, हेअर स्टाईल या सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान भाविकांना महाराष्ट्रातील शक्तीपीठे, पुणे जिल्ह्यातील देवींचे दर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच डॉ. मंजिरी भालेराव, योगेश प्रभुदेसाई, विनीत देशपांडे, प्रिया फुलंब्रीकर, प्रणव गोखले, सौरभ मराठे यांची वेगवेगळ्या विषयांवर दररोज व्याख्याने होणार आहेत. कुटुंबाकरीता लाईव्ह होम मिनिस्टर हा ऑनलाईन गेम शो होणार आहे. हा कार्यक्रम चेताली माजगावकर-भंडारी सादर करणार आहे.

शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुणे लोकमान्य फेस्टिवल मधील (Pune Lokmanya Festival)
कार्यक्रमांचे प्रसारण ऑनलाईन केले जाणार आहे. www.punelokmanyafestival.com,
फेसबुक – punelokmanyafestival, punelokmanyafestival2020, इन्स्टाग्राम punelokmanyafestival2020
या सोशल मीडियावर ऑनलाईन दाखवले जाणार आहेत. लोकमान्य फेस्टिवल मधील स्पर्धांमध्ये सहभाग
घेण्यासाठी स्पर्धकांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 7897893454 या क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवायचे आहेत.
तसेच अधिक माहितीसाठी 9970756606, 9075551530 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी केले आहे.

लोकमान्य फेस्टिवल मधील सर्व कार्यक्रमांचे आयोजन नरेश मित्तल, शुभांगी सातपुते, महेश महाले, चेतन पाटील, ऋषीकेश भोसले, आदित्य सातपुते, स्वप्नील नहार, गौरव सैतवाल, निता ससाणे यांनी केले आहे.

Web Title :- Pune Lokmanya Festival | Events in Navratra festival ‘Pune Lokmanya Festival’ can be watched online

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BMC | ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं नाहीत’; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

Javed Akhtar | वादग्रस्त विधानावरुन जावेद अख्तर यांच्या विरोधात FIR

Pune News | PM मोदी – HM शहांनी देशाची लोकशाही संपवण्याचे काम केले, राष्ट्रवादीचा केंद्र सरकारवर ‘हल्लाबोल’