Pune Loksabha 2024 | मुख्यमंत्री शिंदे आज पुण्यात, मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी महायुतीचा भव्य मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Loksabha 2024 | भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ (BJP Candidate Muralidhar Mohol) यांनी पुणे शहरात प्रचारात आघाडी घेतली असून प्रचाराचा धडका लावला आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडिया आणि प्रचारसभांवर माहोळ यांनी भर दिला आहे. आज मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात महायुतीचा (Mahayuti) भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pune Political News)

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे ज्येष्ठ नेते मोहोळ यांच्या विजयासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. आज मोहोळ यांच्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.(Pune Loksabha 2024)

महायुतीच्या आजच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीचे इतरही बडे नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. एकुणच सध्यातरी मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान, भाजपच्या ४४व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘हर घर मोदी परिवार’ या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी १० हजार कार्यकर्त्यांनी १० लाख मतदारांपर्यंत मोदींचा नमस्कार पोहोचवला. या अभियानात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी सहभागी झाले होते.

या अभियानाबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना,
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७०वे कलम हटविले, पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले,
८० कोटी जनतेला मोफत धान्य, १२ कोटी शौचालयांची बांधणी, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या
मोदी सरकारच्या महत्त्वाच्या कामांची आम्ही मतदारांना माहिती दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Vijay Shivtare | ‘तुम्ही मला मूर्ख समजू नका’, विजय शिवतारेंबाबत अजित पवारांनी मांडली भूमिका (Video)

Shirur Lok Sabha Election 2024 | शिरूरमध्ये भाजपला ‘दे धक्का’, अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार!

Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | आमची लढाई ही दडपशाही विरोधात, सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र