
Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कामशेत रेल्वे स्थानकावर केल्या जाणाऱ्या कामामुळे पुणे लोणावळा लोकलच्या (Pune Lonavala Local) वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवार (दि.१० डिसेंबर) ते मंगळवार (दि. १३ डिसेंबर) या चार दिवसांच्या काळात पुणे-लोणावळा आणि लोणावळा-पुणे मार्गावरील लोकल (Pune Lonavala Local) उशिरा धावणार आहेत.
तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, शनिवार (दि.१०) पासून पुणे-लोणावळा मार्गावर पुणे स्टेशनमधून ९.५५ ची लोणावळा लोकल ११.१७ मिनिटांनी पुणे स्टेशनमधून निघेल, तर दुपारी तीन वाजताची पुणे-तळेगाव लोकल ३ वाजून ४२ मिनिटांनी सुटेल. लोणावळ्यावरून पुण्याकडे रवाना होणारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांची लोकल, दुपारी साडेतीनची
लोकल, तसेच सायंकाळी साडेपाचची लोकल आणि तळेगाव-पुणे दुपारची चार वाजून चाळीस मिनिटांची लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
याशिवाय मंगळवारची (दि. १३) पुण्याहून लोणावळ्यासाठीची दुपारी ४ वाजून २५ मिनिटांची लोकल,
तसेच तसेच लोणावळ्यावरून पुण्यासाठीची ६ वाजून २० मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे.
(Pune Local Time)
Web Title :- Pune Lonavala Local | due to work at kamshet station some local trains departing from lonavala have been cancelled
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Traffic Police | आता अल्पवयीनांना गाडी चालवताना होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड