Pune Lonavala Local Train | पुणे-लोणावळा दरम्यान आणखीन तीन लोकल सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-लोणावळा दरम्यान पूर्वी अप 10 आणि डाऊन 10 अशा एकूण 20 फेऱ्या सुरु असून यामध्ये आता आणखी तीन लोकल (Pune Lonavala Local Train)  म्हणजे सहा फेऱ्यांची भर पडली आहे. पुणे -लोणावळा (Pune Lonavala Local Train) विभागाने 3 लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने सुरु केलेल्या लोकलचे 11 एप्रिल पासून संचालन सुरु होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

नव्याने सुरु करण्यात आलेल्या पुणे-लोणवळा लोकल व वेळ

1. पुणे ते लोणावळा विशेष लोकल (Special Local) क्रमांक 01564 पुण्याहून 11.17 वाजता सुटेल आणि 12.37 वाजता लोणावळ्यात पोहचेल. तर विशेष लोकल क्रमांक 01563 लोणावळा येथून 15.30 वाजता सुटेल आणि पुणे येथे 17.05 वाजता पोहचेल.

2. पुणे ते लोणावळा विशेष लोकल क्रमांक 01570 पुण्याहून 17.15 वाजता सुटेल आणि 18.38 वाजता लोणावळ्यात पोहचेल. तर विशेष लोकल क्रमांक 01569 लोणावळा येथून 19.00 वाजता सुटेल आणि शिवाजीनगर (Shivajinagar) येथे 20.25 वाजता पोहचेल.

3. शिवाजीनगर ते लोणावळा विशेष लोकल क्रमांक 01578 शिवाजीनगर येथून 20.35 वाजता सुटेल
आणि 21.50 वाजता लोणावळ्यात पोहचेल. तर विशेष लोकल क्रमांक 01577 लोणावळा येथून 22.05 वाजता सुटेल
आणि शिवाजीनगर येथे 23.25 वाजता पोहचेल.

Web Title : Another 3 local train will start from 11 april between pune lonavala

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर