मोठी बातमी : पुणे-लोणावळा ‘या’ ३ लोकल रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे ते लोणावळा दरम्यानच्या कान्हे-वडगाव स्टेशन दरम्यान तांत्रिक कामासाठी आज (रविवार १९ मे ) ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या वेळेतील पुणे-लोणावळा मार्गावरील दोन्ही बाजूंच्या तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे; तसेच सकाळच्या वेळेतील लोकल दोन्ही बाजूंनी तळेगावपर्यंतच धावणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

ब्लॉकमुळे करण्यात आलेले बदल –

१) रद्द करण्यात आलेल्या लोकल –

पुण्याहून लोवणाळ्यासाठी जाणाऱ्या तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामध्ये दुपारी १२.१५, दुपारी एक आणि दुपारी तीन वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, लोणाळ्याहून दुपारी २.५०, दुपारी ३. ४० आणि सायंकाळी ५.१५ वाजता पुण्याकडे येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

२) अंशत: रद्द करण्यात आलेल्या लोकल –

सकाळच्या वेळेतील लोकल दोन्ही बाजूंनी तळेगावपर्यंतच धावणार आहेत.
यामध्ये सकाळी सव्वाअकरा वाजताची पुणे-लोणावळा लोकल तळेगावपर्यंतच धावणार आहे. तर, दुपारी २.१९ वाजताची लोणावळा-पुणे लोकल तळेगाव येथून पुण्याकडे सोडण्यात येणार आहे.

३) मार्ग बदल केलेली लोकल –

पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौंड-मनमाड या मार्गे धावणार आहे.